मुंबई -पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
2 मार्च पर्यंत करता येणार अर्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रखडलेल्या होत्या. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमाचे निकाल यंदा उशिरा लागलेल्या आहे. तसेच मुंबई विद्यापीठानेही पीएचडी आणि एमफीलच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू करण्यासाठी विलंब केला होता. त्यामुळे आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार 2 मार्च, 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ही लिंक 26 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट परीक्षा 20 मार्च, 2021 नंतर ॲानलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आलेली आहे.