महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्राला मका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी' - dada bhuse news

संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच राज्यातील मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मका आणि ज्वारी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

dada bhuse
कृषिमंत्री दादाजी भुसे

By

Published : May 8, 2020, 4:18 PM IST

मुंबई - कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच राज्यातील मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मका आणि ज्वारी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

२५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रिक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. राज्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारं पत्र नुकतंच राज्याला पाठवले आहे.


केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेमार्फत खरेदी केली जाणार आहे. खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यतील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details