मुंबई -मरोळ इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचा मुंबईतल्या पाच लसीकरणत केंद्राचा समावेश आहे. या लसीकरण केंद्रामध्ये आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच लसीकरणाचा तिसरा टप्पा देशात सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, पुरेशी माहिती नसल्याकारणाने लसीकरण केंद्राबाहेर लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालय परिसरात गोंधळाची स्थिती -
सेव्हन हिल्स रुग्णालयाबाहेर नोंदणी केलेल्या मात्र मेसेज न आलेल्या लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे परिसरात काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. महापौरांकडून, प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते की जरी नोंदणी झाली असली, तरी मेसेज आल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. परंतु लाभार्थी नोंदणी झाल्यानंतर संबंधित हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी करत असल्याचे आज दिसून आले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनातून कोरोना नियंत्रणााच 'नंदुरबार पॅटर्न'