महाराष्ट्र

maharashtra

राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली? लोकलमधून सर्वसामान्यांचा प्रवास सुरूच

By

Published : Apr 16, 2021, 3:28 PM IST

Updated : Apr 16, 2021, 3:51 PM IST

रेल्वेकडून फक्त अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दिली जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे पास आहे असे प्रवासीसुद्धा लोकल प्रवास करताना दिसून आले आहेत.

लोकल सेवा
लोकल सेवा

मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू ठेवली आहे. मात्र, संचारबंदीच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य प्रवासी त्यांच्याकडील तिकीट पासद्वारे प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली तर दाखवली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकलमधून सर्वसामान्यांचा प्रवास सुरूच

मुख्यमंत्र्यांचा आहवानाला प्रतिसाद नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तर, ठोस कारणासाठी, अत्यावश्यक कारणासाठी लोकल प्रवास करणाऱ्या नागरिकाला तिकिट देण्यात येणार आहे. तसेच विनाआवश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन केल्यानंतरसुद्धा संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी चौका चौकात नाकेबंदी केली आहे. तसेच लोकलमधून अनावश्यक प्रवास करणाऱ्यांवर खूप कमी कारवाई झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.

प्रशासनात ताळमेळ नाहीं
रेल्वेकडून फक्त अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दिली जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे पास आहे असे प्रवासीसुद्धा लोकल प्रवास करताना दिसून आले आहेत. रेल्वे पोलीस अथवा कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांच्या ओळ्खपत्राची तपासणी केली जात नव्हती. यासह रेल्वे प्रशासनाने त्याच्या संबंधित विभागाला कोणत्याही लेखी सूचना कळविल्या नाहीत. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्यावतीने कोणत्याही ठोस हालचाली करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनात ताळमेळ नसल्याचे चित्र दिसून आले. याबाबद रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता राज्य शासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Apr 16, 2021, 3:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details