महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Look Back 2022 : गुन्ह्यांच्या घटनांनी हादरला महाराष्ट्र, पहा कोणत्या घटनांनी वर्षभरात नागरिकांच्या अंगावर आणला काटा - समीर वानखेडे ड्रग्ज विरोधी मोहीम

राज्यात 2022 हे वर्ष (Look Back 2022) अनेक गुन्ह्यांच्या घटनांनी हादरले ( People Shocked From Crime Happened In 2022 )आहे. त्यासह राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या घटनांनीही हे वर्ष जास्त चर्चेत राहिले आहे. यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरण, संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या ( Crime Happened In Year 2022 ) आरोपांनी हे वर्ष चांगलेच गाजले. त्यासह समीर वानखेडे यांच्या ड्रग्ज विरोधी मोहीमेनेही या वर्षात चांगलीच खळबळ उडवली होती. त्यात शाहरुख खानच्या मुलावर केलेली कारवाई चांगलीच वादग्रस्त ठरली.

Look Back 2022
Look Back 2022

By

Published : Dec 27, 2022, 8:42 PM IST

मुंबई -मायानगरी मुंबई शहरासह (Look Back 2022) राज्याला गुन्हेगारीचा विळखा कायम आहे. कधी बलात्कार, खून, आत्महत्या आणि गँगरेप सारख्या अनेक घटना मुंबईत ( People Shocked From Crime Happened In 2022 ) घडतात. मात्र, अलीकडे शहरात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सायबर चोरटे अनेक माध्यमांतून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून पैशांवर डल्ला मारताना आढळून येतात. २०२२ या वर्षाला निरोप देताना मुंबईसह राज्यभरात गुन्हेगारी विश्वात ( Crime Happened In Year 2022 ) घडलेल्या टॉप १० बातम्या कोणत्या हे पाहुयात.

  1. संजय राऊत यांना ED कडून अटक शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. गोरेगावच्या पत्राचाळ ( Patra Chawl Fraud Case ) पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ( ED Arrest To Sanjay Raut ) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची सुमारे ८ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना ईडीने १ ऑगस्टला अटक केली.

2) 12 वर्षीय आरोपी मुलाच्या वडिलांचा 7 वर्षीय पीडितेच्या पालकांवर हल्ला३० नोव्हेंबरला 12 वर्षांच्या मुलाने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण ( Girl Sexual abuse In Mumbai ) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात ( People Shocked From Crime Happened In 2022 ) तक्रारही देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे आरोपी मुलाच्या पित्याने पीडित मुलीच्या आईवडिलांवरचे हल्ला केल्याचे समोर आले. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ( Crime Happened In Year 2022 ) स्थानकात ( Vikhroli Police Station ) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी मुलासह त्याच्या वडिलांवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

३) लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान कोरियन युट्यूबरचा विनयभंगदक्षिण कोरियातील ( Korean woman molested In Mumbai ) युट्यूबर महिलेचा मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणाकडून लैंगिक छळ होत असल्याचा व्हिडिओ ३० नोव्हेंबरला रात्री व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल ( Crime Happened In Year 2022 ) झाल्यानंतर मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान यूट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी ( People Shocked From Crime Happened In 2022 ) अटक करण्यात आली. खार पोलिसांनी 354 आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांनाही अटक केली.

४) १०० कोटींच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुजरातमधून दोघांचा ताबाअंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) २१ डिसेंबरला १०० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ( NCB Seize MD ) माजी वैमानिक सोहेल गफार महिदासह दोघांचा ताबा घेतला. फोर्ट परिसरातून जप्त करण्यात आलेल्या ४९ किलो मेफेड्रॉन (एमडी) प्रकरणी गुजरातमधून दोघांचाही ताबा घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीबीच्या ( Crime Happened In Year 2022 )पथकाने ६ ऑक्टोबरला एसबी पथ, फोर्ट, मुंबई येथे असलेल्या एका गोदामातून सुमारे ४९ किलो एमडी जप्त केले होते. त्यावेळी याप्रकरणी मोहम्मद खत्री व फारुख खत्री यांना अटक ( People Shocked From Crime Happened In 2022 ) करण्यात आली होती. चौकशीत खत्रीने मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या प्रेमप्रकाश सिंह यांच्याकडून अंमलीपदार्थ घेतल्याचे सांगितले. रसायनशास्त्र पदवीधर असलेल्या सिंह याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने(एएनसी) गेल्यावर्षी २५०० किलो एमडी जप्त करून विक्रमी कारवाई केली होती.

५) गुप्तांगास सिगारेटचे चटके देऊन महिलेवर गँगरेपमुंबईतील एका ४२ वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना ( People Shocked From Crime Happened In 2022 ) कुर्ला येथे ४ डिसेंबरला घडली. पीडितेवर धारदार शस्त्राने वार केले आणि सिगारेटने तिच्या ( Crime Happened In Year 2022 ) गुप्तांगास चटके दिल्याचे वैद्यकीय तपासात उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

६) NSE फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना ईडीकडून अटकमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( People Shocked From Crime Happened In 2022 ) यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) १९ जुलैला अटक करण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण ( Crime Happened In Year 2022 )यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४ जुलैला अटक केली होती. त्यानंतर संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली होती. दिल्ली हायकोर्टाकडून त्यांना २२ डिसेंबरला जमीन मंजूर झाला.

७) क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला क्लीन चिटकॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा सहभाग असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यामुळे एनसीबीने ( People Shocked From Crime Happened In 2022 ) आर्यन खानला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅटींग आढळल्याचा आरोपही एनसीबीने केला होता. त्यानंतर आर्यन खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपपत्र ( Crime Happened In Year 2022 ) सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिला होता. एनसीबीकडून मे महिन्यात पहिले आरोपपत्र कोर्टात सादर केले. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये आर्यन खानचे नाव नव्हते. दरम्यान आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राजकीय क्षेत्रातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते तता मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर तुटून पडले. त्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीतून बदली करण्यात आली. तर आर्यन खानप्रकरणी एनसीबीने विशेष चौकशी समिती स्थापन केली.

८ ) नवाब मलिकांच्या अडचणीत वाढक्रुझ ड्रग प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे ( People Shocked From Crime Happened In 2022 ) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी (Nawab Malik) जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे ( Crime Happened In Year 2022 ) यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर, आता समीर वानखेडे आक्रमक झाले असून नवाब मलिक यांच्याविरुद्ध त्यांनी पोलिसांत १६ ऑगस्टला तक्रार दिली आहे.

९) वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक - एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक ( Crime Happened In Year 2022 ) निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक फेकल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यांनतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते ( People Shocked From Crime Happened In 2022 ) यांना ताब्यात घेतले. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमधील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि अटक करण्यात आली होती.

१०) सिद्धू मुसेवाला हत्येच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढअभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने वाय प्लस दर्जाची सुरक्षा नोव्हेंबरमध्ये प्रदान करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सलमानला स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवानाही मुंबई ( People Shocked From Crime Happened In 2022 ) पोलिसांकडून देण्यात आला होता. बिश्नोई गँगकडून आलेल्या धमक्या आणि केल्या गेलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांनाही झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा , अशा आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी बॉलिवूड स्टार सलमान खान याचे वडील सलीम खान यांना ६ जूनला मिळाली. त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details