महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फडणवीसांसाठी जनादेश...लोकांसाठी मात्र 'जनरोष यात्रा'? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व काही सुजलाम-सुफलाम असल्याचे मुख्यमंत्री प्रत्येक सभेत सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळी होती. याचा पहिला अनुभव परभणीत मुख्यमंत्र्यांना आला. सभेत मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होते. काही शेतकरी उभे राहिले आणि पिकविम्याचं, कर्जमाफीचं बोला; अशी जोरदार मागणी करू लागले. अचानक काय झाले हे समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट भारत माता कि जय....च्या घोषणाच द्यायला सुरूवात केली. बळीराज काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कारण वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांना कदाचित माहित होती. त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांकडून काही जाणून न घेता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे जाहीर करून टाकले.

महाजनादेश

By

Published : Sep 24, 2019, 11:59 AM IST

Updated : Sep 24, 2019, 12:53 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्टला महाजनादेश यात्रेला सुरूवात झाली. मात्र, महाजानादेश मागण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी गालबोट लागले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाचा तर काही ठिकाणी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाचाही सामना त्यांना करावा लागला. विरोधकांनी तर त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. हे का घडत होते याचा घेतलेला हा एक आढावा....

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सर्व काही सुजलाम-सुफलाम असल्याचे मुख्यमंत्री प्रत्येक सभेत सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळी होती. याचा पहिला अनुभव परभणीत मुख्यमंत्र्यांना आला. सभेत मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होते. काही शेतकरी उभे राहिले आणि पिकविम्याचं, कर्जमाफीचं बोला; अशी जोरदार मागणी करू लागले. अचानक काय झाले हे समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट भारत माता कि जय....च्या घोषणाच द्यायला सुरूवात केली. बळीराज काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कारण वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांना कदाचित माहित होती. त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांकडून काही जाणून न घेता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे जाहीर करून टाकले.

असात प्रकार अहमदनगरमध्येही झाला. अहमदनगर -जिल्ह्यात अकोले येथील सभा संपल्यानंतर संगमनेरच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना, शर्मिला येवले या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तीने काळ्या शाईचा फुगा ताफ्यातील गाडीच्या दिशेने फेकला होता. शेतकऱ्यांची स्थिती किती गंभिर आहे हे तीला सांगायचे होते. पण तीचेही ऐकून घेण्यात आले नाही.

हेही वाचा - आता चर्चेची नाही तर कृतीची गरज, भारतात जलजीवन मिशनची सुरुवात - पंतप्रधान मोदी

मुख्यमंत्री या यात्रेच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. कोल्हापुरात राष्ट्रवादीने बॅनरबाजी केली. सोलापूरात काळे झेंडे दाखवले गेले. सांगलीत जनतेचा रोष पत्करावा लागला. वातावरण तापत होते. याची कल्पना सरकारला होती. मग पुढे काळजी घेतली जावू लागले. हिंगोलीत सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तरी ही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांना काळे झेंडे दाखवले. नाशिकमध्ये मोदींच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता होती. त्याला काही गालबोट लागू नये म्हणून पिशव्या, कांदे, भाजीपाला घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती.

पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांवर हल्लाबोल

महाजनादेश यात्रा बारामतीमध्येही आली होती. तीथे तर फडणवीसांना अजित पवार समर्थकांनी चांगलाच दणका दिला. एकच वादा अजित दादाच्या घोषणेने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्र हादरून गेली. ही मुख्यमंत्र्यांची यात्रा आहे की अजित पवारांची हे काही वेळ समजतच नव्हते. शेवटी लाटीचार्ज करावा लागला आणि जमावाला पांगवण्यात आले.

कर्जमाफीवरून आदित्यचाही टोला

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असताना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे जन आशिर्वाद यात्रा करत होते. या यात्रेत " कर्ज माफ झाले " असे सांगणारा एकही शेतकरी आपल्याला मिळाला नाही असे ते जाहीरपणे सांगत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी होणारा विरोधक किंवा रोष का स्विकारावा लागत होता याची कल्पना येते.

ते लोक काँग्रेस-राष्ट्रवादीचे ?

महाजनादेश यात्रेत ज्या लोकांनी गोंधळ घातला ते सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. म्हणजेच जेंव्हा लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेत्यांच्या सभेत मोदी मोदी घोषणा दिल्या जात होत्या, ते देणारे हे भाजपचेच कार्यकर्ते होते का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा - सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा

ही आहेत रोषाची कारणे

कर्जमाफी, पिकविमा, जलयुक्त शिवार, हमीभाव या सर्व आघाड्यांवर सरकार यशस्वी झाल्याचे फडणवीस सांगत आहे. असे असेल तर त्यांनी निर्भिड होऊन जनते समोर जायला हवे होते. ज्यांचे आक्षेप होते त्यांच्या बरोबर चर्चा करणे गरजेचे होते. पण जे विरोध करत होते त्यांनाच त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचा शिक्का मारला. यावरून सर्व काही ठिक नाही असे राजकिय विश्लेषकांना वाटते. अजूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे असे स्वत अदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. पिक विम्यात गोंधळ आहे यासाठी शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. विरोधकांनीही सभागृहात आणि सभागृहा बाहेर कर्जमाफी, पीकविमा, शेतकरी आत्महत्या या प्रश्न सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. या गोष्टी पाहिल्या असता मुख्यमंत्री सांगत असलेली स्थिती आणि प्रत्यक्ष स्थिती यात तफावत आहे. म्हणूनच त्यांना येवढ्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

Last Updated : Sep 24, 2019, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details