मुंबई - भारत ७३ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करणार आहे. देशभरात प्रचंड उत्साह असून अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या बाजारात भारतीय झेंड्याचे टी शर्ट, स्टिकर्स व फ्लॅग पिन्स मोठ्या प्रमाणात विकायला आले आहेत. स्वातंत्र्यता दीनापूर्वी अनेक भारतीय या गोष्टी उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत. लहानग्यांपासून ते वयोवृद्ध लोक या वस्तू खरेदी करत आहेत.
मुंबईत बाजारामध्ये स्वातंत्र दिनानिमित्ताने वस्तू खरेदीसाठी लोकांची मोठ्याप्रमाणात पसंती
देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. त्याचनिमित्ताने प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने स्वतंत्र दिवस कसा साजरा करावा यासाठी तयारी करत असतो त्यामुळेच मुंबईतील बाजारात स्वतंत्र दिनाच्या खरेदीची जय्यत तयारी दिसते.
स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्टला साजरा केला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. त्याचनिमित्ताने प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने स्वतंत्र दिवस कसा साजरा करावा यासाठी तयारी करत असतो त्यामुळेच मुंबईतील बाजारात स्वतंत्र दिनाच्या खरेदीची जय्यत तयारी दिसते.