महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भांडूपमध्ये कृत्रिम तलाव कोसळला, स्थानिकांचे आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातच गणेश मुर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, बाप्पांच्या आगमनापूर्वीच भांडुप येथील कृत्रिम फुटल्याने आसपासच्या परिसराला तळ्याचे रुप आले होते.

lake
फुटलेला तलाव

By

Published : Aug 22, 2020, 5:29 PM IST

Updated : Aug 22, 2020, 7:02 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबई आणि उपनगरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. पण, भांडुपमध्ये शुक्रवारी (21 ऑगस्ट) दुपारी लाला शेठ कंपाऊंड परिसरातील कृत्रिम तलाव फुटल्याने या तलावांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत स्थानिकांनी आंदोलन केले.

बोलताना नागरिक

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिकरित्या गणेश मुर्तींचे विसर्जन करु नये, अशा सुचना सरकारकरडून करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मीती करण्यात येत आहे. मात्र, आगमनापूर्वीच ही घटना घटल्याने या घटनेनंतर आसपासच्या सोसायट्यांना तळ्याचे रूप आले होते. ही घटना विसर्जन वेळी घटली असती मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते, असा आरोप करत आज (दि. 22 ऑगस्ट) स्थानिकांनी या तलावात जाऊन मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिमेचे तलावात विसर्जन केले व पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

लाखो रुपये खर्चून बनविण्यात आलेली ही कृत्रिम तलाव भ्रष्टाचाराचे कुरण असून जर विसर्जनाच्यावेळी ही घटना घडली असती तर जीवित हानी देखील झाली असती त्यामुळे हे तलाव बनविणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनुभव नसलेल्यांना कृत्रिम तलाव बांधण्याची कंत्राट देऊन सामान्य नागरिकांचे लाखो रुपये पाण्यात घातल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा -यंदा लालबाग मंडळाकडून आरोग्योत्सव साजरा...

Last Updated : Aug 22, 2020, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details