मुंबई - पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील कोट्यवधी हिंदूंचा विश्वासघात केला. राम मंदिर विषयाचा वापर आपल्या राजकारणासाठी करत त्यानी हिंदूंचाही अपमान केला. यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा म्हणून आम्ही 'हिंदुस्तान निर्माण दल' या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरलो असल्याचे हिंदुस्थान निर्माण दलाचे कोकण प्रांत प्रमुख दिनेश पाटील यांनी मुंबईत सांगितले.
मोदींनी देशाचा विश्वासघात केला - दिनेश पाटील
हिंदुस्थान निर्माण दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाची संस्कृती, सभ्यता, परंपरा यांचा सन्मान व संरक्षण झाले पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे, यासाठी या दलाची निर्माण केली आहे.
भाजपने सत्तेत आल्यानंतर काश्मिरी पंडितांचा विषय सोडवला नाही. काश्मीर संदर्भात असलेले ३७० कलम हटवले नाही त्याशिवाय ३५ ए हेही समाप्त केले नाही. समान नागरी कायद्याचा विषय भाजपने वेळोवेळी समोर आणला. परंतु, त्यावरील काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही देशभरात भाजपच्या विरोधात मैदानात उभे असल्याचे पाटील म्हणाले.
हिंदुस्थान निर्माण दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाची संस्कृती, सभ्यता, परंपरा यांचा सन्मान व संरक्षण झाले पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे, यासाठी या दलाची निर्माण केली आहे. भाजपने सत्ता आल्यानंतर देशातील करोडो हिंदू समाजाचा विश्वासघात केला त्यांच्या विरोधातही आमचा पक्ष काम करणार असल्याचेही ते म्हणाले. आम्ही देशभरात विविध ठिकाणी उमेदवार उभे केले असून कोकणात दोन आणि मुंबईत उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातून निलेश कुडतरकर यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.