मुंबई- आज सकाळपासूनच शहरात व उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपरच्या मेट्रो आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती.
पावसाचा फटका; कुर्ला ते सायनसह हार्बर रेल्वे मार्ग ठप्प; घाटकोपर मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची गर्दी - Harbor Railway
मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन मार्गावर पाणी भरल्याने व हार्बर रेल्वे मार्गावरील रुळावर पुलाचा स्लॅब कोसळल्याने दोन्ही मार्ग पूर्णतः ठप्प झाली आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील अंधेरी, बोरिवली, बांद्रा, व त्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांनी घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती. घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी
मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन मार्गावर पाणी भरल्याने व हार्बर रेल्वे मार्गावरील रुळावर पुलाचा स्लॅब कोसळल्याने दोन्ही मार्ग पूर्णतः ठप्प झाली आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील अंधेरी, बोरिवली, बांद्रा,आणि त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांनी घाटकोपर मेट्रो व रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर प्रवाशांनी बेस्ट बसेसमध्ये सुद्धा गर्दी अनुभवली. दरम्यान, मध्य रेल्वे कुर्ला ते कल्याण जाणाऱ्या रेल्वे सेवा धीम्या गतीने चालू झाल्या आहेत. मात्र, दुपारच्या सत्रात घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली होती.