मुंबई - येथील हार्बर मार्गावरील टिळकनगर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाला लोकलमध्ये झालल्या वादात चालत्या गाडीतून बाहेर फेकल्याची घटना घडली. बसण्याच्या जागेसाठी हा वाद झाला होता. विजय गुप्ता असे बाहेर फेकलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला जोराचा मार लागला आहे. त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार - रेल्वत भांडण बातमी मुंबई
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोजच बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ प्रचंड गर्दी होते. जागा मिळवण्यासाठी हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वाशी येथून सुटलेली सीएसटीएमला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये जागेवरून सह प्रवाशी उठला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले.
हेही वाचा-अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोजच सीट मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ प्रचंड गर्दी होते. जागा मिळवण्यासाठी हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वाशी येथून सुटलेली सीएसटीएमला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये जागेवरून सह प्रवाशी उठला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. हे भांडण सहप्रवाशाच्या जीवावर बेतलं आहे. भांडणातून लोकल प्रवासी असलेल्या विजय गुप्ताला लोकलमधून टिळकनगर आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान बाहेर फेकले. बाहेर पडलेल्या प्रवाशास रेल्वे पोलिसांनी तत्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.