मुंबई - स्वस्थ राहण्यासाठी रोज व्यायाम करा, गाडी न वापरता सायकल चालवा, असे अनेक सल्ले आपण रोजच ऐकत असतो. त्याचप्रमाणे सायकल चालवल्याने शरीर स्वस्थ तर होतेच शिवाय पेट्रोलचाही खर्च वाचतो. वाहतूककोंडीमधून वाट काढायलाही सायकलसारखे दुसरे साधन नाही. हीच गोष्ट लक्षात घेत वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबई मेट्रो १ प्रशासनाने सायकलचा पर्याय शोधून काढला आहे.
मेट्रो प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; स्थानकावर उतरताच २ रुपयात मिळणार सायकल - MYBYK APP
'MYBYK' या अॅपच्या माध्यमातून या सेवेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. जीपीआरएस वापरुन दुचाकी अनलॉक करण्यासाठी हे अॅप प्रवाशांना मार्गदर्शन करेल, अशी माहिती या कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागृती नगर मेट्रो स्थानकाबाहेर फक्त दोन रुपये तास या दराने भाड्याने सायकल उपलब्ध होणार आहे. रविवारी या सायकल योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
'MYBYK' या अॅपच्या माध्यमातून या सेवेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. जीपीआरएस वापरुन दुचाकी अनलॉक करण्यासाठी हे अॅप प्रवाशांना मार्गदर्शन करेल, अशी माहिती या कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार भविष्यात मुंबई मेट्रो १ च्या इतर स्थानकांवरही सायकल भाड्याने देण्याचा विचार करू, असे एमएमआरडीएचे आयुक्त ए. आर. राजीव यावेळी म्हणाले.