मुंबई- घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील असल्फा मेट्रो स्थानकाला लागूनच असलेल्या एका चाळीतील दुमजली घराचा वरचा माळा काल (शनिवार) रात्री कोसळला. यात घरातील ३ लोक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.
घाटकोपरमध्ये घराचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही - असल्फा
घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील असल्फा मेट्रो स्थानकाला लागूनच असलेल्या एका चाळीतील दुमजली घराचा वरचा माळा काल (शनिवार) रात्री कोसळला. यात अडकलेल्या तीघांना सुखरूप वाचविण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले.
कोसळलेल्या घरात रोहिणी पाडगावकर, वंदना पाडगावकर आणि सप्तक सोनवणे हे रहात होते. जेव्हा घराचा काही भाग कोसळला तेव्हा घरातील सदस्य आतमध्येच अडकले होते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांना सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी पालिकेचे अधिकारी देखील दाखल झाले होते. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित धोकादायक भाग पाडला. हे दुमजली घर अतिशय जुने झाले होते. ज्यात खालच्या मजल्यावर एक चहाची टपरी तर वर हे कुटुंब रहात होते. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन