मुंबई :लहान मुलांना मोबाईल-टीव्हीचे व्यसन असणे चांगले नाही. आजकाल लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत, ते कसे वापरायचे, हे सर्व मुले काही मिनिटांत शिकतात. याशिवाय टीव्ही न पाहता जेवण न करण्याची सवय जवळपास प्रत्येक मुलामध्ये दिसून येते. मात्र, टीव्ही पाहण्याच्या ओघात त्यांचे नीट जेवणही होत नाही. दुसरीकडे चुकून ते रिमोट कंट्रोलवर पडले किंवा मोबाईलचे चार्जिंग संपले आणि त्यांचे आवडते कार्टून चॅनल बदलले तर मुलांचे रडणे ही घरोघरची गोष्ट बनली आहे. विभक्त कुटुंबात, पालकांना मुलावर सतत लक्ष ठेवता येत नाही, म्हणून ते मोबाईलचा जास्त वापर करतात. मोबाईल मुलांच्या हातात देतात. टीव्ही चालू करतात. तर काही पद्धतींचा अवलंब करून पालक मुलांच्या सवयीपासून मुक्त होऊ ( parents Addiction of mobile phones and TV ) शकतात.
मुलांना वेळ द्या :मोकळा वेळ घालवण्यासाठी मुलं मोबाईल आणि टीव्ही बघायला लागतात. जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांना व्यसन जडते. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. शेवटी शेअरी पेक्षा प्रॅक्टीकल नोलेज नेहमीच चांगले असते. जेव्हा मूल पालकांसोबत व्यस्त असते. तेव्हा तो टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर जातो. यामुळे त्याच्या मेंदूचाही चांगला विकास होतो. पालकांनी मुलांना त्यांच्यासोबत व्यस्त ( Parents should keep children busy with them ) ठेवावे.