मुंबई :प्रत्येक पालकाला अपेक्षा असते की त्यांचे मूल वाचन आणि लेखनात वेगवान ( Parenting Tips ) असावे. त्याने इतर कामातही पुढे असावे. पण जेव्हा मुलांच्या पालकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा ते मागे राहतात. पाल्याने हुशार बनवायचे असेल असे तुम्हाला वाटत असेल. तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. लहानपणापासूनच मुलाला काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांची बैद्धीक क्षमता वाढते. हे तुमचे मूल बाकीच्यांपेक्षा दोन पावले पुढे ठेवेल. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मुलांचा आयक्यू लेव्हल वाढतो.
संगीत शिकवा :संगीताची आवड असणाऱ्या मुलांची स्मरणशक्ती चांगली असल्याचे संशोधनातून समोर आले (Music learning ) आहे. तुमच्या मुलाला एखादे वाद्य वाजवायला शिकवा. मुलाला गिटार, सितार, तबला, हार्मोनियम यातले कोणतेही वादन शिकवू शकता. यामुळे मुलाची आयक्यू लेव्हल वाढेल आणि त्याच्यात गणिती कौशल्येही विकसित होतील.