मुंबई- 'मुंबई पोलीस आयुक्त'पदाच्या शर्यतीत राहिलेले राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परमबीरसिंग लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी - anti corruption bureau
'मुंबई पोलीस आयुक्त' पदाच्या शर्यतीत राहिलेले राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती मिळाली आहे.
परमबीरसिंग
या अगोदर लाचलुचपत विभागाचे तत्कालीन महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर लाचलुचपत विभागाचे महासंचालक पद रिक्त झाले होते. यावर गृह विभागाकडून परमबीरसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता परमबीर सिंग यांच्या नंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या,अपर पोलीस महासंचालक पदी कोण येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.