नवी मुंबई - लॉकडाऊन वाढल्याने चोरून गावी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावरून गावी चालत जाणाऱ्यांना मज्जाव केला जात असल्याने नागरिकांनी चक्क लोहमार्गाचा वापर करत आहेत. या नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी कर्नाळा येथील निवारागृहात करण्यात आली आहे.
मुंबई ते कोकण रेल्वे रूळावरून पायी प्रवास करणाऱ्या 57 जण पोलिसांच्या ताब्यात - पनवेल लॉकडाऊन
मुंबई ते कोकण असा रेल्वे रूळावरून पायी प्रवास करणाऱ्या 57 जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 14 एप्रिलनंतर टाळेबंदी वाढणार आहे.
स्थलांतरासाठी रस्त्याने पायी जाताना पोलीस मज्जाव करीत असल्याने आता नागरिकांनी थेट लोहमार्गाचा वापर सुरू केला आहे. मुंबई ते कोकण असा रेल्वे रूळावरून पायी प्रवास करणाऱ्या 57 जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 14 एप्रिलनंतर टाळेबंदी वाढणार आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढल्याने त्यांनी आता लोहमार्गद्वारे पायी प्रवास सुरू केल्याचे समोर आले आहे. सध्या रेल्वे बंद असल्याने रुळावरून येणे जाणे कठीण असले तरी सोपे झाले आहे. मानखुर्दपासून ते त्यानंतर थेट खाडीवरील रेल्वे रुळावरून वाशी रेल्वे स्थानकापर्यंत जीवघेणा प्रवास करून, नागरिक गावी जाण्याचा प्रयत्न करीत होते.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांना माहिती मिळतात पोलिसांचे पथक लावून पनवेल शहर पोलीस ठाण्यात येणाऱ्या रुळावरून पायी जाणाऱ्या 57 जणांना ताब्यात घेतले व त्यांची रवानगी पनवेल महानगरपालिकेच्या निवारागृहात केली आहे. परजिल्ह्यात पायी प्रवास करणाऱ्यांसाठी निवारागृह सुरू केले आहेत. गाव गाठण्यासाठी मुंबईबाहेर निघालेल्या 57 जणांचा मुक्काम सध्या निवारागृहात करण्यात आला आहे.