मुंबई - पुणे शहरात जुलै १९६१ मध्ये झालेल्या पानशेत पुराच्या दुर्घटनेनंतर पुणे परिसरातील अनेक कुटुंबे बेघर झाली. या पूरग्रस्तांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने भुखंड प्रदान करण्यात आले होते. हे भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड पुरग्रस्तांना मालकी हक्काने देण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. ८ मार्च) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ एकूण १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थामधील २० हजार ९५ सभासदांना होणार आहे.
या निर्णयानुसार मूळ पूरग्रस्तांच्या प्रकरणी,१ फेब्रुवारी १९७६ रोजीची जमिनीची किंमत व २६ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार व्याजाची आकारणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेऊन अधिकृतरित्या हस्तांतरित भूखंडप्रकरणी १ फेब्रुवारी १९७६ रोजीची जमिनीची किंमत व २६ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार व्याजाची आकारणी करुन येणाऱ्या एकूण रकमेवर ५० टक्के जादा रक्कम आकारण्यात येणार आहे.