मुंबई : दक्षिण मुंबई शिवसेना वाढवण्यास पांडुरंग सकपाळ यांचा मोठा हातभार आहे. गेल्या बारा वर्षांपासून सकपाळ हे सक्रिय विभाग प्रमुख काम करत होते. शिवसेनेत पडलेल्या गटबाजी नंतरही दक्षिण मुंबईत पांडुरंग सपकाळ यांनी गड राखला. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये तशी माहिती प्रसिद्धकरिता दिली आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाचे राजकारण यामागे असल्याची चर्चा विभागात सुरू आहे.
राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन :दक्षिण मुंबई आंदोलनाचा आक्रमक चेहरा म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख आहे. अनेक, आंदोलन त्यांनी गाजवली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर युवा प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी राज्यपालांविरोधात सातत्याने आक्रमक आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केले होते. धोती फेडो, पेटारा आंदोलन चांगलेच व्हायरल झाले होते.