महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साम, दाम, दंड, भेद सगळं वापरूनही पंढरपूरच्या जनतेने महाआघाडीला नाकारले

भाजपाचे समाधान आवताडे यांनी सध्या विजयी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यांचा विजय हा जवळपास निश्चत मानला जात आहे. ही निवडणूक महाविकासआघाडी व भाजपाकडून एकप्रकारे प्रतिष्ठेची करण्यात आल्याचे प्रचार कालावधीत दिसून आले होते. त्यानंतर आता निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याने भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला गेला आहे.

केशव उपाध्ये
केशव उपाध्ये

By

Published : May 2, 2021, 7:01 PM IST

मुंबई - आज संपूर्ण देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची जोरदार चर्चा आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची. येथील पोटनिवडणुकीत भाजपाकडून समाधान आवताडे आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाली. ज्यामध्ये भाजपाचे समाधान अवताडे यांनी सध्या विजयी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यांचा विजय हा जवळपास निश्चत मानला जात आहे. ही निवडणूक महाविकासआघाडी व भाजपाकडून एकप्रकारे प्रतिष्ठेची करण्यात आल्याचे प्रचार कालावधीत दिसून आले होते. त्यानंतर आता निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याने भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला गेला आहे.

महाविकास आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण मांडून बसले, टप्प्यात आले की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा, प्रशासनाचा फौजफाटा आणि साम, दाम, दंड, भेद हे सगळे करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौल असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न ठरला मुद्दा -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा आणि राजकीय सभांचा विषय ठरला होता. त्याशिवाय, राज्यातील कोरोनाच्या संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपकडून मोठा करण्यात आला होता. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details