महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठमोळ्या शिंदे बंधूंची पालखी कॅब येणार लोकांच्या सेवेला - ओला

प्रफुल शिंदे आणि विपुल शिंदे या २ मराठमोळ्या शिंदे बंधूनी पालखी कॅब वाहतूक सुविधा सुरू करणार आहेत. येत्या ३० तारखेला या पालखी कॅबचे उद्घाटन होणार आहे.

मराठमोळ्या शिंदे बंधूंची पालखी कॅब येणार लोकांच्या सेवेला

By

Published : Apr 9, 2019, 9:46 PM IST

मुंबई- ओला आणि उबेर टॅक्सीला प्रतिस्पर्धी म्हणून त्याहीपेक्षा अधिक सोयीसुविधा पुरविणारी वाहतूक सुविधा भारतात सुरू करण्यात येणार आहे. प्रफुल शिंदे आणि विपुल शिंदे हे २ मराठमोळे शिंदे बंधू ही पालखी कॅब वाहतूक सुविधा सुरू करणार आहेत. येत्या ३० तारखेला या पालखी कॅबचे उद्घाटन होणार असल्याचे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

मराठमोळ्या शिंदे बंधूंची पालखी कॅब येणार लोकांच्या सेवेला

पालखी कॅबची खासियत

१. पालखी कॅब ही कंपनी ब्लॉग चेन टेक्नॉलॉजीमधील भारतातील पहिली कंपनी असणार आहे.

२. महिलांच्या सुरक्षितेसाठी अद्ययावत कॅमेऱ्याच्या सुविधा

३. २४ तास सर्च फ्री सर्विस

४. विविध भाषिक प्रशिक्षक ड्रायव्हर

५. ई-कॉमर्स सुविधा

६. कॅबने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महिला बचत गटातर्फे टिफिन सेवा घेता येणार

मुंबईतील २० हजार कॅब मालकांनी यात ऑनलाइन सहभाग नोंदवला आहे. इतर कॅबच्या तुलनेने या पालखी कॅबचे भाडे कमी असून ही कॅब महाराष्ट्रात सर्वत्र असणार आहे. या कॅब व्यवसायात अधिकाधिक तरुण-तरुणींना सामावून घेतले जाणार असल्याचे यावेळी प्रफुल शिंदे यांनी सांगितले. पालखी कॅबमधून अनेकांना रोजगार मिळणार असून अनेक लोकांना कमी पैशात उत्तम सोयी सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details