महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल ५० वर्षानंतर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय नागरिकत्व - काराडीया

२०१६ साली आसिफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण गेली ५० वर्षे भारतात राहत असून भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करूनही त्यावर कुठलाही निर्णय होत नसल्याचे  त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Mar 26, 2019, 12:43 PM IST

Updated : Mar 26, 2019, 3:55 PM IST

मुंबई -भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयात गेली अनेक वर्षे कायदेशीर लढा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आसिफ काराडीया यांना आता लवकरच भारतीय नागरिकत्व बहाल केले जाणार आहे. असे केंद्रीय गृह मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

आसिफ काराडीया यांचे वंशज हे भारतीय होते. मात्र, फाळणीनंतर काराडीया यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण आसिफ काराडीया यांनी काही वर्षातच पुन्हा भारतात येऊन मुंबईत राहण्यास सुरवात केली होती. पत्नी, तीन मुले असे आसिफ यांचे कुटुंब आहे. पण प्रदीर्घ विजाची मुदत संपल्यावर आसिफ काराडीया यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.

२०१६ साली आसिफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण गेली ५० वर्षे भारतात राहत असून भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करूनही त्यावर कुठलाही निर्णय होत नसल्याचे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. यावर उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने येत्या १० दिवसात आसिफ काराडीया यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Mar 26, 2019, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details