महाराष्ट्र

maharashtra

नाशिकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही उभारणार ऑक्सिजन पार्लर; मध्ये रेल्वेचा उपक्रम

By

Published : Dec 18, 2019, 6:40 PM IST

मध्य रेल्वे विभागात रोप वाटिका (ऑक्सिजन पार्लर) उभारण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकापासून झालेली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही अशी रोप वाटिका उभारण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक १७ हजार रुपयाचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

mumbai
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबई- मध्य रेल्वे विभागात रोप वाटिका (ऑक्सिजन पार्लर) उभारण्यात येणार आहे. या पार्लरमध्ये ऑक्सिजन देणारे रोपटे तयार करून त्याची विक्री करण्यात येईल. यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. नासाकडून मान्यता प्राप्त रोपटे या रोप वाटिकेतून विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकापासून झालेली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही, अशी रोप वाटिका उभारण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक १७ हजार रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार

महसूल वाढविण्यासाठी मध्य रेल्वे नव-नवीन कल्पना राबवत असते. यावेळी मध्य रेल्वेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विभागातील रेल्वेस्थानकांवर ऑक्सिजन वाटिका लावण्याची योजना आखली आहे. या योजनेची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकापासून झाली आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपटी लावण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळणार आहे. या रोप वाटिकेतून प्रवाशांना साधारण २०० ते ५०० रुपयांपर्यत रोपटे विकत घेता येईल. भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी 'न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम' (एनआयएनएफआरआयएस) मार्फत अनेक योजना आखल्या जात आहे. त्यातील हा एक उपक्रम आहे.

दरम्यान, प्रवाशांना रोप वाटिकेतून योग्य दरात रोपटे विकत घेता येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. नाशिकनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरसुद्धा ऑक्सिजन पार्लर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वे जागेची पहाणी सुरू आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरू झाल्यावर मुंबईतील प्रवाशांना देखील रोपटे विकत घेता येणार आहे.

हेही वाचा-'...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

ABOUT THE AUTHOR

...view details