मुंबई -रेमडेसीवीरची वाढती मागणी, तुडवडा आणि काळाबाजार अशा परिस्थितीत गरजू रुग्णांची मात्र मोठी अडचण होत आहे. पण आता काही प्रमाणात रेमडेसीवीरचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. कारण आता राज्य सरकारने 21 हजार 500 इंजेक्शन खरेदी केले आहेत. हा साठा या आठवड्यात मुंबईत येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त (औषध), मुख्यालय जुगल किशोर मंत्री यांनी दिली आहे. तर या साठ्यापैकी 60 टक्के साठा मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी तर 40 टक्के साठा इतर जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आठवड्याभरात परिस्थिती सुधारेल, इंजेक्शन उपलब्ध होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
या आठवड्यात 21 हजार 500 इंजेक्शनचा साठा येणार, रेमडेसीवीरचा प्रश्न सुटणार?
रेमडेसीवीरची वाढती मागणी, तुडवडा आणि काळाबाजार अशा परिस्थितीत गरजू रुग्णांची मात्र मोठी अडचण होत आहे. पण आता काही प्रमाणात रेमडेसीवीरचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. कारण आता राज्य सरकारने 21 हजार 500 इंजेक्शन खरेदी केले आहेत. हा साठा या आठवड्यात मुंबईत येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात रेमडेसीवीरचा तुडवडा असून काळाबाजार सुरू आहे. पण काळाबाजाराचा आरोप सातत्याने एफडीएकडून फेटाळला जात होता येते. मात्र मिरारोड येथे झालेल्या काळ्या बाजाराविरोधातील कारवाईनंतर एफडीएने आता यू टर्न घेतला असून तपासणी-कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे रेमडेसीवीरचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 21 हजार 500 इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता हा साठा आठवड्याभरात मुंबईत येईल असे मंत्री यांनी सांगितले आहे.
मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक गंभीर रूग्ण आहेत. त्यामुळे हा 21 हजार 500 इंजेक्शनचा साठा आल्यानंतर यातील 60 टक्के इंजेक्शन मुंबई-ठाण्याला देण्यात येणार असून उर्वरित इंजेक्शन जसे रूग्ण अधिक तसे त्या त्या जिल्ह्याला देण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजूंना वेळेत इंजेक्शन उपलब्ध होतील असा दावा केला जात आहे. दरम्यान सिप्ला आणि हिट्रोकडून ही उत्पादन वाढवण्यात येत असून नवीन प्लांटवर उत्पादन केले जाणार आहे. दुसरीकडे मे. मायलॉन फार्मा कंपनीलाही उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याभरात उत्पादन वाढेल आणि हा प्रश्न सुटेल असा दावा केला जात आहे.