मुंबई - कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटवर नावाचा नवीन प्रकार आला आहे. त्यावर आमच्या लसीचा डोस प्रभावी असल्याचा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून करण्यात आला आहे. ही लस घेतल्याच्यानंतर न्यूट्रिलायझिंग अँटीबॉडीचे प्रमाण दिसून आले आहे. या अँटीबॉडीचे प्रमाण किमान आठ महिने प्रभावी राहत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे. ही लस 85 वर्षांवरील नागरिकांना, ज्याला गंभीर आजार आहे त्यांना आणि कोरोना झाल्याने ज्याची परिस्थिती गंभीर आहे त्यांच्यासाठी प्रभावी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
'कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या अँटीबॉडी होतात तयार'
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सर्व जगभर चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीकडून लसीचा दक्षीण आप्रिका, ब्राझीलसह जगभर अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ती सर्व देशांत प्रभावी ठरल्याचे या संशोधनात पुढे आले आहे. दरम्यान, याबाबतचे संशोधन चालू असताना जेटा(पी 2) वेरिएंट'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. तसेच, या काळात जॉन्सन अँड जॉन्सन या लसीने कोरोनावर प्रभावी ठरणारी अँटीबॉडीही तयार केली असल्याचे समोर आले आहे.
'कोरोनावर पुर्णपणे प्रभावी लस'
जॉन्सन अँड जॉन्सनच्या कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष तथा मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टाफेल्स यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर जगातील सर्व स्तरावरील लोकांच्या आरोग्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनची लस कोविड 19 लसीसारखीच प्रभावी आहे. तसेच, ही लस कोरोनाच्या विरोधात पुर्णपणे प्रभावी ठरत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ही लस डेल्टा आजारावर मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरत असून, ही लस शरीराच्या मजबूतीसाठीही प्रभावी आहे. याबरोबरच जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या एका अभ्यासात यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीचे प्रमाण किमान आठ महिने कायम राहत असल्याचेही समोर आले आहे.
'न्यूट्रिलायझिंग अँटीबॉडीज तयार होतात'
जॉन्सन अँड जॉन्सन (जॉन्सन अँड जॉन्सन)चे प्रमुख मथाई मैमेन यांनी सांगितले की, आजपर्यंत केलेल्या अभ्यासात जी अकडेवारी समोर आली आहे, त्यावरुन जॉन्सन अँड जॉन्सन 19 लसीचा एक डोस शरिरात न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडीज तयार करतो. तसेच, या आठ महिन्यांपासून आम्ही सातत्याने या लसीच्या परिणामांबाबत निरिक्षण करत आहोत असेही मैमेन यांनी सांगितले आहे.
'जॉन्सन अँड जॉन्सनचा एक डोस महत्वाचा ठरणार'
या लसीवर केलेल्या संशोधनाच्या प्रत्येक निष्कर्षाच्या आधारावर आम्ही खात्रीशीर सांगतो आहोत की, कोरोना वाढत आहे. तसेच, त्याचे नवीन स्वरुप समोर येत आहे. मात्र, या सर्वांना पुर्णपणे संपवण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनचा एक डोस महत्वाचा ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.