महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रिन्स प्रकरण: महापालिका सभागृहात थर्ड पार्टी चौकशीची मागणी - prince burned

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर नावाचा दोन महिन्याचा मुलगा शॉर्टसर्किट झाल्याने भाजला आहे. पालिकेच्या स्थायी समितीनंतर शनिवारी सभागृहात त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणाची चौकशी थर्ड पार्टीकडून करावी, डीनला निलंबित करावे अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

मुंबई - महापालिका

By

Published : Nov 16, 2019, 8:00 AM IST

मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर नावाचा दोन महिन्याचा मुलगा शॉर्टसर्किट झाल्याने भाजला आहे. पालिकेच्या स्थायी समितीनंतर शनिवारी सभागृहात त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणाची चौकशी थर्ड पार्टीकडून करावी, डीनला निलंबित करावे अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

प्रिन्स प्रकरण: महापालिका सभागृहात थर्ड पार्टी चौकशीची मागणी

हेही वााचा - पालिकेच्या कंत्राटदारांवर प्राप्तीकराच्या धाडी सुरूच; ईडीही गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता

प्रिन्सच्या कुटुंबियांना तसेच इतर दुर्घटना घडल्यावर नुकसान भरपाई देण्यासाठी पॉलिसी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिका रुग्णालयात केसपेपर घेतल्यापासून रुग्णालयातून जाईपर्यंत काही दुर्घटना घडल्यास त्याला नुकसान भरपाई देता येईल असे या योजनेत असेल असे प्रशासनाने स्पष्ट केले. या योजनेवर चर्चा करुन येत्या 20 नोव्हेंबरला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहाला संगितले.

हृदयाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी प्रिन्सच्या पालकांनी उत्तर प्रदेश येथून त्याला केईएम रुग्णालयात आणले होते. उपचार सुरू असताना ईसीजी मशीनमध्ये शॉर्टकसर्किट झाल्याने गादी जळून प्रिन्सचा हात, कान आणि छातीचा भाग भाजला. यात त्याला गँगरिंग होऊन हात कापावा लागला. ही दुर्घटना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याने प्रिंन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची केली आहे. रुग्णालयाचे डीन व दोषी डॉक्टर अधिकारी यांची चौकशी थर्ड पार्टीकडून करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. त्याला सर्वच पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत नुकसान भरपाईसाठी योजना बनवण्याची मागणी केली. मालाड येथील भिंत पडल्याच्या दुर्घटनेत योजना नसताना मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणून 10 लाखांची मदत केली त्याच प्रमाणे प्रिन्सच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.

केईएम रुग्णालयात 100 पदे इलेक्ट्रीक विभागात रिक्त असून त्याठिकाणी असलेल्या असिस्टंट इंजिनियर या फक्त नवीन टेंडर काढण्याचे काम करतात. याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाजपाच्या राजश्री शिरवडकर यांनी प्रिन्सला कृत्रिम हात लावण्याची तसेच त्याच्या आयुष्यभराचा खर्च पालिकेने उचलण्याची मागणी केली. तर पालिका नुकसान भरपाई देणार नसेल तर सर्व 227 नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन (प्रत्येकी 25 हजार) प्रिन्सच्या कुटुंबियांना द्यावे अशी सूचना अभिजित सामंत यांनी केली. शॉकसर्किटने आग लागून प्रिन्स 20 ते 22 टक्के जळेपर्यंत आयसीयूमधील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय होते कुठे असे प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले.

झाडे पडून, रस्त्यावरी खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू, मालाड सारख्या दुर्घटना आदीसाठी नुकसान भरपाई देता यावी यासाठी योजना तयार करायची आहे. यावर चर्चा करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला गटनेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात येईल असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

हेही वाचा - 'बीडीडी' चाळींच्या पुनर्विकास कामाला लवकरच सुरुवात - मधू चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details