महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Budget Session 2023: महाविकास आघाडीकडून विधानभवनाच्या पायऱ्यावर अभिनव आंदोलन; जितेंद्र आव्हाडांनी सुनावले सरकारला खडे बोल - Jitendra Awhad news

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सुरू आहे. आज महाविकास आघाडीकडून विधानभवनाच्या पायऱ्यावर अभिनव आंदोलन करण्यात आले. विधानभवनाचा परिसर गुजरातचा निरमा क्लीन चीट मिळवा, तब लड़े थे गोरों से अब लडेंगे चोरों से, हर किसी की पसंद निरमा वॉशिंग पावडर अशा घोषणांनी दणाणून सोडला होता. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टर झळकावत सरकार तसेच बेस्ट प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

budget session 2023
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023

By

Published : Mar 24, 2023, 12:47 PM IST

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई :राज्याच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक विविध मुद्द्यांवर आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहेत. आज देखील विरोधकांनी विधानपरिवार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. निरमा वॉशिंग पावडरने कपडे धुतल्याने ते स्वच्छ होतात, असे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात सांगितले होते. मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटकच्या राज्याच्या जाहिरातीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे.


तात्काळ जाहिराती हटवा :कर्नाटक सरकारच्या जाहिराती बेस्ट प्रशासनाने तात्काळ हटवाव्यात. आज मुंबईमध्ये सरकारने जिथे प्रशासक नेमला आहे. त्यांची कशा पद्धतीने मनमानी सुरू आहे. ही कर्नाटकची जाहिरात मराठी माणसाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांना आमची विनंती आहे की, तात्काळ या जाहिराती काढून टाका. नाहीतर जे होईल, त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, असा धमकी वजा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.



बेस्ट बसेसवर कर्नाटकच्या जाहिराती :या प्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १९४६ साली सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आजही संपली नाही आहे. कर्नाटक सरकार आजही आपल्या लोकांवर अतिरेक करत आहे. ८६५ गावात दिलेली आरोग्य सेवा कर्नाटक सरकारने बंद केली आहे. तेथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या भाषेची सक्ती केली जात आहे. हे सर्व असताना मुंबईत बेस्ट बसेसवर कर्नाटकच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत. बेस्टमध्ये मुंबईतील लोकांच्या घामाचा पैसा आहे. मुंबईने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे. हे सर्व असताना अशा पद्धतीने कर्नाटक सरकारची जाहिरात मुंबईच्या बेस्ट बसवर करणे किती उचित आहे? असा प्रश्नही अहवाल यांनी याप्रसंगी उपस्थित केला. आता फक्त कर्नाटक राज्याची सहल आयोजित करण्याचे बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटवले :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानानंतर सरकारने तात्काळ कारवाई करत धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटवले. तोच मुद्दा पकडत राज ठाकरे यांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, काल एका व्यक्तीने एका प्रश्नावर आवाज उठवला व तत्काळ कारवाई झाली. पण मी काही मॅच फिक्सिंग करून आलेलो नाही, म्हणून मी काही अल्टिमेट देणार नाही.ज्या दिवशी माहीम दर्ग्याविषयी मुद्दा उपस्थित झाला, त्यानंतर आता ही आग धुमसत जाणार आहे. हे जगजाहीर झाले आहे. आता मुंब्रया मध्ये अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम पडायला सुरुवात झाली आहे. सरकार कारवाई करत आहे. पण ती योग्य प्रकारे व्हायला हवी, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा : Congress Protest : राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, रणनीती आखून राजधानीत काढणार मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details