मुंबई : त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे परंपरा सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेत जातीय तेढ निर्माण करू नका, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या आज भाजपला लगावला. नोटबंदीचून काही निष्पन्न झाले नाही, उलट काळा पैसा बाहेर आला नसल्याची टीकाही अजित पवार यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
नोटबंदीमुळे जनतेची गैरसोय होऊ देऊ नये :या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. मात्र या नोटाबंदीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे काळा पैसा परत आला नाही, उलट काळा पैसा बाहेर गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे नागरिकांना नोटबंदीतून त्रास होणार नाही, याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिकांनी वानखेडेवर केलेले आरोप खरे ठरले :राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी एलसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. ते आरोप आता सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन नवाब मलिक यांनी केलेले आरोप बरोबर होते, असेच स्पष्ट झाल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मात्र तेव्हा नवाब मलिक यांच्या आरोपाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याचा आता भुर्दंड भोगावा लागत आहे. समीर वानखेड यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तेव्हा समीर वानखेडे यांचे समर्थन करणारे आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.