महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंत्रमाग घटकांना ऑनलाइन अर्जास 2 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Electricity subsidy

महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आहे. ही सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाइन अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाइन व 27 अश्वशक्तीखालील घटकांनी ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले आहे.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Sep 16, 2021, 8:55 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आहे. ही सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाइन अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाइन व 27 अश्वशक्तीखालील घटकांनी ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले आहे.

ऑनलाइन-ऑफलाइन अर्जास परवानगी

सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन तसेच 25 फेब्रुवारी, 2021च्या शासन निर्णयान्वये 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 2 सप्टेंबर, 2021 च्या शासन पत्रानुसार एक महिन्याची म्हणजे 2 ऑक्टोबर, 2021 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जोपर्यंत ते सदर नोंदणी करीत नाहीत तोपर्यंत बंद करण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत, त्यामुळे सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी विहित मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन किंवा ऑफलाइन (27 अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली-उगले यांनी कळविले आहे.

येथे करा नोंदणी

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आलेली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत देण्यात आलेली होती. त्यानंतर यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदर मुदत 31 मे, 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली होती. मात्र, या मुदतीतही बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही.

हेही वाचा -'कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यवधींची उधळपट्टी?' नितेश राणेंचा महापौरांना सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details