मुंबई - पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी बेहराम बाग येथील हनुमान चाळीत झालेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 14 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा आज (रविवार २६ मे) कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे. शकुंतला कागल असे या मृत महिलेचे नाव आहे.
जोगेश्वरी गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू - cylinder
शकुंतला कागल या ४६ वर्षीय महिलेचा आज पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्यापही ट्रॉमा रुग्णालयात 5, सायन रुग्णालयात 2, कस्तुरबा रुग्णालयात 2 रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. ५ जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बागमधील हनुमान चाळीत २१ मे रोजी रात्री गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या स्फोटात १४ जण जखमी झाले होते. जखमीपैकी १३ जणांवर नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात तर एकावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर अधिक उपाचारासाठी जखमींना सायन, कस्तुरबा आदी रुग्णालयात हलवण्यात आले.
त्यापैकी शकुंतला कागल या ४६ वर्षीय महिलेचा आज पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्यापही ट्रॉमा रुग्णालयात 5, सायन रुग्णालयात 2, कस्तुरबा रुग्णालयात 2 रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. ५ जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.