महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Murder : चालताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला भोसकले; अल्पवयीन मुलाची हत्या - अल्पवयीन मुलाची हत्या

नवी मुंबई कामोठे सेक्टर चारमध्ये एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या (minor Murder) करण्यात आली आहे. विशाल राजकुमार मौर्य असे 17 वर्षीय मयत मुलाचे नाव (Mumbai massacre) आहे. रवींद्र राजेश अटवाल उर्फ हरियाणी (वय वर्षे 22) आणि राज संतोष वाल्मिकी (वय वर्षे 19) अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime) (Latest news from Mumbai)

Minor Murder
Minor Murder

By

Published : Oct 29, 2022, 10:45 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबई कामोठे सेक्टर चारमध्ये एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या (minor Murder) करण्यात आली आहे. विशाल राजकुमार मौर्य असे 17 वर्षीय मयत मुलाचे नाव (Mumbai massacre) आहे. रवींद्र राजेश अटवाल उर्फ हरियाणी (वय वर्षे 22) आणि राज संतोष वाल्मिकी (वय वर्षे 19) अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime) (Latest news from Mumbai)

हत्याकांडातील आरोपी

शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण -27 ऑक्टोबरला रात्री अकराच्या दरम्यान विशाल मौर्य कामोठे फुटपाथवरून जात होता. फुटपाथ वरून चालत असताना आरोपी हरियाणी आणि संतोष वाल्मिकी हे मद्यधूंद अवस्थेत समोरून येत होते. आरोपींना विशाल मौर्यचा चुकून धक्का लागला याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी विशालला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या मारहाणी दरम्यान आरोपी राजने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने विशालच्या पाठीत वार केले. या गंभीर हल्ल्यामध्ये विशालचा मृत्यू झाला असल्याची माहिती कामोठे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ यांनी दिली आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details