महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चॉकलेटचे आमिष दाखवून 5 अल्पवयीन मुलींचा विनयभंग; नराधम गजाआड

हा विकृत आरोपी रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या शाळकरी मुलींना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून निर्मनुष्य ठिकाणी नेत असे, त्यानंतर तो अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे करत होता.

अल्पवयीन मुलींचा विनयभंग

By

Published : Aug 26, 2019, 3:03 PM IST

मुंबई- शहरातील घाटकोपर आणि पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून ९ ते १० वर्षांच्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र तो नराधम पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान, १३ ऑगस्टला घाटकोपर परिसरातील भटवाडी येथे अशाच प्रकारे एका १० वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केल्यानंतर या आरोपीला गजाआड करण्यात त्यांना यश आले आहे.

पोलिसांनी सचिन अनंत शामा (३५) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने गेल्या काही महिन्यात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ , पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ तर साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ असे गुन्हे केले केल्याचे उघड झाले आहे. हा विकृत आरोपी रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या शाळकरी मुलींना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून निर्मनुष्य ठिकाणी नेत असे, त्यानंतर तो अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे करत होता.

असा पकडला गेला आरोपी-

१३ ऑगस्टला घाटकोपर भटवाडी परिसरात डान्स क्लासवरून घरी निघालेल्या एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आरोपी सचिनने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून भटवाडी परिसरातील निर्मनुष्य परिसरात नेले. त्यावेळी आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली असता, आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. रस्त्यावरील एका वाटसरूने घाबरलेल्या मुलीला तिच्या घरी आणून सोडल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. या संदर्भांत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत आरोपीला भटवाडी परिसरातून अटक केले. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला २९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details