मुंबई - २०१४ पेक्षा एक जागा जास्तच जिंकू, आम्ही काल बारामतीला धक्का दिला, आज अहमदनगरमध्ये यापुढे असे अनेक धक्के बसणार आहेत, सुजय विखे यांचा निर्णय योग्यच होता, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मुंबईत बोलत होते.
२०१४ लोकसभा निवडणुकीपेक्षा १ जागा जास्तच जिंकू - मुख्यमंत्री - mla
अनेक पक्षांना उमेदवार सापडत नाहीत. सुजय यांनी पक्षात येताना कोणतीही अट टाकली नाही. त्यांना नगरच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे नाव सुचवले आहे. आज नाही उद्या सुजय यांच्या घरच्यांना त्यांचा निर्णय योग्य होता असे सांगतील, सुजय विखे राज्यात रेकॉर्डब्रेक मते घेवून विजयी होतील
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सुजितसिंह ठाकूर, कृषीमंत्री सदाभाऊ खोत सह भाजपचे अनेक कार्यकर्ते व सुजय विखे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. तिकिटासाठी अनेक नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारत आहेत, मुंबईत आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे यांनी पत्नीसह भाजपचे कमळ हाती घेतले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, अनेक पक्षांना उमेदवार सापडत नाहीत. सुजय यांनी पक्षात येताना कोणतीही अट टाकली नाही. त्यांना नगरच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे नाव सुचवले आहे. आज नाही उद्या सुजय यांच्या घरच्यांना त्यांचा निर्णय योग्य होता असे सांगतील, सुजय विखे राज्यात रेकॉर्डब्रेक मते घेवून विजयी होतील.