मुंबई- मुंबईत कचऱ्याची समस्या नवीन नाही. पण, तोच कचरा कचरा कुंडीत न टाकता उघड्यावर टाकत नागरिक वेळ भागवतात. कुर्ला पूर्व भागातील कसाईवाडा हा डोंगर उतारावरील भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुमजली तिमजली झोपड्या आहेत.डोंगराळ भागामुळे वरच्या ठिकाणावर राहणारे लोक हे खालच्या भागातील घरांवर आपला कचरा टाकतात. यामुळे येथील झोपड्यांवर दाब निर्माण होऊन येथील झोपड्या कोसळ्याच्या घटना सतत घडत असतात. तसेच उतारावरील दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात. अशीच एक घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक ठार तर एक जण जखमी झाले आहेत.
कुर्ल्यातील कसाईवाड्यातील कचराच ठरला कसाई, घेतला एकाचा बळी
मुंबई - कुर्ल्यातील कसाईवाड्यात घरावरील कचऱ्याने घेतला एकाचा बळी
अशा कचऱ्यामुळे कसाईवाड्यात राहणारे अब्दुल मोहम्मद रशीद कुरेशी (वय 48 वर्षे) यांच्या घरावर दाब निर्माण झाला. यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला आणि रहिमाबी कुरेशी (वय 65 वर्षे) या जखमी झाल्या. जखमी महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी स्थानिक नागरिक इम्राना अनिस कुरेशी यांनी अशा घटनांना महानगरपालिका जबाबदार आहे. अशीच दरड 3 वर्षांपूर्वी कोसळून या ठिकाणी 3 मुलांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही उतारावरील लोकांना घरावर कचरा टाकू नका, असे म्हटल्यास येथे हाणामाऱ्या होतात. यामुळे कोणीही त्यांना बोलत नाही, असेही त्या म्हणाल्या.