मुंबई -मालवणी पोलीस ठाणे हद्दीतील राठोडी येथे अवैद्य गुटखा विक्रीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या संदर्भात एका आरोपीला अटक करणयात आली आहे. राजेश महेंद्र प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
४ लाख ५५ हजारांचा गुटखा जप्त -

राठोडी गावात अवैद्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारो मालवणी पोलिसांनी राठोडी येथे छापा टाकून सुमारे ४ लाख ५५ हजारांचा गुटखा जप्त केला. या कारवाई दरम्यान एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
हेही वाचा - बर्ड फ्लू : पोल्ट्री व्यावसायिकांना केरळ सरकार देणार नुकसानभरपाई