महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत 119ने वाढ, 26 जणांचा मृत्यू - mumbai corona update

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. या काळात राज्यातील 2 हजार 325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यापैकी 1 हजार 5 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 26 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

maharashtra police corona news
राज्यातील पोलिसांना वाढता कोरोनाचा संसर्ग

By

Published : May 30, 2020, 12:51 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत 119ने भर पडली. यामुळे पोलीस खात्यात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत राज्यात 2 हजार 325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारानंतर 1 हजार 5 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या 1 हजार 330 पोलिसांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये 175 पोलीस अधिकारी असून 1 हजार 155 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 26 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनची व्यवस्थित अंमलबाजवणी करण्यासाठी पोलीस राज्यात ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी होते.

लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188नुसार तब्बल 1 लाख 19 हजार 222 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 706 जणांवर क्वारंटाइन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांवरील हल्ल्याच्या 255 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 833 जणांना अटक केली आहे.

कोरोनाच्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 96 हजार 875 फोन आले आहेत. अवैध वाहतुकीच्या 1 हजार 323 प्रकरणात 76 हजार 89 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात आतापर्यंत 23 हजार 533 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 43 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details