मुंबई- राज्य विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. अंतरीम अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चाही सुरु झाली आहे. कोणत्याही चर्चेशिवाय अंतरिम बजेटला विधानसभेत एकमताने मंजूरी देण्यात आली आहे. महालेखापाल आणि लोकलेखा समितिचे अहवालही सभागृहात मांडले आहेत. त्यानंतर एक तासासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळले
देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे अधिवेशन गुंडाळले आहे.
विधानसभाो
वैमानिक वर्धमान अभिनंदन यांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. विमानतळ विकास कंपनी, लोकसेवा आयोग, झोपडपट्टी प्राधिकरण, वीज नियामक आयोग अहवाल पटलावर ठेवले आहेत. महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक २०१९ हे विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषण पटलावर ठेवले आहे.
Last Updated : Feb 28, 2019, 1:41 PM IST