मुंबई - अंधेरी येथील एका विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. येथील गणेश मंदिर येथील मालापा डोंगरी नंबर ३ येथील एका विहिरीत एका युवक तरंगताना आढळून आला. या मृतदेहाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरीतील विहिरीत आढळला मृतदेह.. - young
मुंबई अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी या युवकाला विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधिन केले.
अंधेरीतील विहिरीत मृतदेह सापडला
मुंबई अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी या युवकाला विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी त्या युवकाला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. प्रशांत प्रभाकर मालवणकर (वय २८) असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजते. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.