महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vashi Creek Bridge Suicide : पत्नीसह मेहुण्याला व्हिडिओ कॉल करत मारली पुलावरुन उडी - suicide by jumping Vashi Bay bridge

वाशी खाडीपुलावरून उडी ( Jump Vashi creek bridge ) घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या ( man commits suicide ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीलासह मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून खाडीत उडी मारून आत्महत्या ( Committed suicide by video calling ) केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Oct 25, 2022, 10:37 PM IST

नवी मुंबई -वाशी खाडीपुलावरून उडी ( Jump Vashi creek bridge ) घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या ( man commits suicide ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीलासह मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून खाडीत उडी मारून आत्महत्या ( Committed suicide by video calling ) केली आहे. प्रशांत वायकर (वय 34) असे आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे नाव असून तो चेंबूर, मुंबईचा रहिवाशी होता.

पत्नीसह मेहुण्याला व्हिडीओ कॉल करत मारली पुलावरुन उडी

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या - खाडीच्या गाळात रुतल्यामुळे नाका तोंडात पाणी शिरून सदर व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या पत्नी, मेहुण्याला व्हिडीओ कॉल करत प्रशांतने खाडीत उडी मारली. कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रशांतने हे पाऊल उचचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरतीमुळे प्रशांतची डेडबॉडी वाहून गेली असून पोलिसांची शोधमोहिम सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details