मुंबई - तामिळनाडू १९८५ साली घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. हत्येच्या गुन्ह्यातून तो जामीनावर सुटला पण जीव वाचवण्यासाठी नाव बदलून न्यायालयात न जाता मुंबईत राहत होता.
खूनप्रकरणी जामीनानंतर नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक - prakash
१९८५ साली राजकीय वैमनस्यातून तामिळनाडूत 'डीएमके' या राजकीय पक्षाचे प्रवक्ते एस. आर. नागराजन आणि त्यांची पत्नीची राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी निर्घृण हत्या केली होती.
१९८५ साली राजकीय वैमनस्यातून तामिळनाडूत 'डीएमके' या राजकीय पक्षाचे प्रवक्ते एस. आर. नागराजन आणि त्यांची पत्नीची राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी निर्घृण हत्या केली होती. याचा बदला म्हणून २०१२ साली तामिळनाडूत राजकीय वादातून दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. तामिळनाडू पोलिसांनी ७ आरोपींना अटक केल्यावर न्यायालयात चाललेल्या खटल्यांच्या काही महिन्यातच या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.
मुख्य आरोपी प्रकाश जगदिश पंडियान उर्फ अभिमन्यू याच्यावर डीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जामीन मिळाल्यावर ३ वेळा जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्या सुरक्षेसाठी तामिळनाडू न्यायालयाने त्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवली होती. कालांतराने न्यायालयानेही सुरक्षा काढून घेतली. घाबरलेला आरोपी जगदीश पंडियान (वय ३१) याने जीव वाचवण्यासाठी तामिळनाडूतून पळ काढून मुंबईत नाव बदलून राहू लागला. मात्र या दरम्यान प्रकाश पांडियन हा तामिळनाडू न्यायालयातील तारखांना मात्र हजार राहत नसल्याचे त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते.
मुंबईतल्या सायन परिसरत तामिळ लोकांची मोठी वस्ती आहे. त्या गर्दीत आरोपीने नाव बदलून राहायला सुरुवात केली होती. यासाठी त्याने बनावट कागदपत्रे, ओळखपत्र बनवून घेतले होते. पण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास सायन परिसरातून अटक केली.