मुंबई:मराठा आरक्षण प्रकरणांमध्ये वकील गुणवत्त सदावर्ते यांच्याकडून काही आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपा दरम्यान देखील अपमान जनक टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने शिस्तबंगाची कारवाई सुरू केली होती. आणि या कारवाई पासून बचाव मिळण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. एसटी महामंडळाच्या संपाच्या वेळी दरम्यान त्यांनी केलेल्या प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान आणि अपमान कारक टिप्पणी तसेच मराठा आरक्षण प्रकरणात देखील त्याच पद्धतीने केलेले वक्तव्य. ह्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात स्वतंत्र याचिका दाखल आहेत. आणि या याचिकांमुळे कारवाई अटळ होती. म्हणूनच वकील गुन्हा रत्न सदावर्ते यांनी त्या कारवाई पासून संरक्षण मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.
दोन्ही आंदोलनाच्या दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वकिलांचा वेश कोर्ट आणि इतर बाबी परिधान करून त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. तसेच एसटी कामगारांच्या संपाच्या दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आठ एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला. त्यानंतर आरोपींना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीला के गोखले आणि न्यायमूर्ती जी एस पटेल यांनी गुणवत्ते सदावर्ते यांच्या याचिकेचा उल्लेख केल्यावर खंडपीठाने या प्रकरणाची यादी करण्यास सहमती दर्शवली. सदावर्ते यांच्या संदर्भात ज्या तक्रारी केल्या गेल्या. आणि त्यामध्ये जो आरोप आहे. त्यानुसार त्यांनी 9 ऑक्टोंबर 2020 रोजी दूरचित्रवाणी च्या सार्वजनिक चर्चेदरम्यान खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केली तसेच बेजबाबदार टिपणी देखील केली.