मुंबई :केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांच्या निधीतून ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभाग यांच्या सहयोगाने ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामीण भागातल्या महिलांच्या विकासासाठी उमेद अभियान राबवले जाते. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना स्वयं सहाय्यता गट स्थापन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना संघटित केले जाते. आणि त्यांचे ग्राम संघ आणि त्यांचे विभाग संघ बांधणी करून त्यांच्या उत्पादित मालाला मुंबई ,नवी मुंबई ,पुणे, नागपूर ,अहमदाबाद बेंगलोर ,दिल्ली, अशा शहरांमध्ये उठाव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केला जातो.
महिला रोजगारासाठी प्रयत्न: महालक्ष्मी सरस या नावाने हा उपक्रम देशभर राबवला जातो. यंदा 570 बचत गट महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून या सहभागी होणार आहे .आणि 70 बचत गट यापैकी महाराष्ट्र बाहेरून देखील सहभागी होणार आहे .यामध्ये' रेडी टू इट फूड हे स्टॉल' लावले जातील. त्यामुळे शहरातील मध्यमवर्गीय लोकांना चवीचे खाणाऱ्या लोकांना येथे विविध ग्रामीण महिलांनी तयार केलेले पदार्थ खाता येणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच अत्यंत दिमागदार पद्धतीने ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगाराच्यासाठी हा विशेष प्रयत्न 08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने होत आहे.
महिलांसाठी विविध सुविधा: ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत महिलांचे बचत गट सुरू केले जातात. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याच्यातून संसाधन व्यक्ती तयार होतात. विविध प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण प्रकल्प महिलांनी तयार करावे. प्रकल्प अहवाल देखील महिलांनी तयार करावे आणि बँकांकडे त्यांनी जावे .आणि बँकांकडून कर्ज घ्यावे आणि स्वतः उद्योजक म्हणून त्या नावारूपाला याव्यात या पद्धतीचा प्रयत्न यातून केला जातो. कोरोना महामारीमुळे हे काम थंडावले होते. मात्र आता तब्बल दोन वर्षांनी पुन्हा महालक्ष्मी सरस हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या जीवन उन्नतीसाठी राबवला जात आहे .आणि या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करणार आहेत.