Savitribai Phule birth anniversary : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ( Krantijyoti Savitribai Phule Jayanti ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी अभिवादन केले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
मुंबई : स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ( Savitribai Phule Jayanti ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने साजरा केला जाणारा 'सावित्री उत्सव' आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेला ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान यालाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान चिरंतन असे आहे. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला ( Open the door to education for women ) झाला. या शिक्षित पिढ्यांतून आलेल्या अनेक माता-भगिनी, विदुषींनी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा आणि अभिमानास्पद असा वाटा उचलला आहे. आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. यापुढेही स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण यात राज्य अग्रेसर राहील यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सावित्रीबाईंच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान, गौरव वाढेल याकरिता अनेक विविध योजना, उपक्रम राबवण्यावर भर राहील. हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव ( Naigaon in Satara district ) या गावी झाला होता. पुढे 9 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षित नव्हत्या पण लग्नानंतर पती ज्योतीबांनी त्यांना लिहायाला वाचायला शिकविले. त्याकाळी चालू असलेल्या रुढी-परंपरा व कर्मकांड, अस्पुश्यांचा होत असलेला रागद्वेश पाहून ज्योतीबांनी समाजात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवायची ठरवली. याला साथ मिळाली ती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची. सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या समवेत महिला सबलीकरणामध्ये विशेषत: शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.