मुंबई - केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, असे सांगून 'सतत' या योजनेचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून आरोपीने अनेकांची फसवणूक केली होती. ज्योतिकुमार अगरवाल असे या फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. माटुंगा पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर, आरोपी करायचा लोकांची आर्थिक फसवणूक
ज्योतिकुमार अगरवाल असे या फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. माटुंगा पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
आरोपी ज्योतिकुमार अगरवाल
आरोपी पियुष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी बनवून लोकांची फसवणूक करायचा. महत्वाचे म्हणजे बनावट मेलवरून आर्थिक व्यवहारासाठी हा आरोपी पीडितांशी संपर्क साधून होता.
या प्रकरणी तक्रारदार मनिष छगनलाल पटेल (वय ५४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने पटेल यांच्याकडून ८० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यावरून माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Last Updated : Mar 18, 2019, 8:43 PM IST