महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकलवर दगडफेकीचे सत्र सुरूच, मंगळवारी घडलेल्या 4 घटनांमध्ये 3 प्रवासी जखमी - stone pelter

मुंबई लोकल रेल्वेवर दगडफेकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कडक कारवाई करणे आवश्यक बनले आहे.

लोकल रेल्वेवर दगडफेकीचे सत्र चालूच

By

Published : Jul 17, 2019, 7:31 AM IST

मुंबई- लोकल रेल्वेवर दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. मंगळवारीदेखील कुर्ला ते विध्यविहार आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर दरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीत 3 प्रवासी जखमी झाले आहेत.


मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान कुर्ला ते विध्यविहार या स्थानकादरम्यान धावत्या लोकल रेल्वेवर अज्ञातांनी दगडफेक केली. यात राजेश पवार (वय17) या प्रवाशाच्या डाव्या डोळ्यावर दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. याच ठिकाणी दुसरे प्रवासी हरिशंकर कहार (वय 23) रत्नदीप चंदनशिवे हे जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे हार्बर मार्गावर कुर्ला ते टिळक नगर रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेकीमुळे तौसिफ खान (वय 31) जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

लोकल रेल्वेवर दगडफेकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस व लोहमार्ग पोलीस यांना अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना आखण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details