मुंबई- कोरोनासाठी खबरदारी म्हणून 22 मार्चला जनता कर्फ्यू देशभरात लावण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी सर्वांनी ताळी, थाळी वाजवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. संरक्षण दलाकडूनही राज्यातील 303 भोंगे वाजवण्यात येणार होते. मात्र, त्या दिवशी केवळ 5 भोंगे वाजवण्यात आले, तर उर्वरित भोंगे वाजवण्यात आले नाहीत. आपत्तीत नागरिक संरक्षण दल कार्यरत नसल्याने, असे झाले असल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वयंसेवकांनी सांगितले.
COVID-19 : ...म्हणून 'जनता कर्फ्यू' दिवशी केवळ 5 भाेंगे वाजले
महाराष्ट्रातील एकूण 303 भोंग्यापैकी एकमेव मुंबईत 270 भोंगे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व भोंगे वाजवण्यात येणार होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. हे भोंगे वाजविण्याची जबाबदारी नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची होती.
हेही वाचा-चिंताजनक..! केरळ, महाराष्ट्रासह तेलंगाणात कोरोनाचे 77 नवे रुग्ण
महाराष्ट्रातील एकूण 303 भोंग्यापैकी एकमेव मुंबईत 270 भोंगे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व भोंगे वाजवण्यात येणार होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. हे भोंगे वाजविण्याची जबाबदारी नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची होती. हे स्वयंसेवक अत्यंत निष्ठेने भोंगा चाचणी करुन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे व नियंत्रण केंद्राकडे देतात. परंतु, सध्याचे नागरिक संरक्षण दलाचे संचालक आयपीएस संजय पांडे यांनी स्वयंसेवकांची भरती करुन घेणे आणि त्यांची नियुक्ती करण्याची पद्धतच गेल्या पाच वर्षात मोडीत काढली आहे. त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक कोरोना व्हायरस आपत्तीमध्ये काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे याला जबाबदार कोण? हे निश्चित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्ती वेळी जबाबदारीने काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वयंसेवकांनी केली आहे.