महाराष्ट्र

maharashtra

वृत्तनिवेदिकेला अश्लील मेसेज पाठविणे पडले महाग; आरोपीला ठोकल्या बेड्या

By

Published : Jul 13, 2019, 5:52 PM IST

संबंधीत आरोपीने पीडित वृत्तनिवेदिकेला टीव्हीवर पाहिले. त्यानंतर तिला फेसबुकवर शोधले आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई- सोशल मीडियाच्या माध्यमातून एका वृत्तनिवेदिकेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला पश्चिम बंगाल येथील कल्याणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आतानू रवींद्र कुमार असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांच्या कफ परेड पोलिसांनी ही कारवाई केली.

अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

संबंधीत आरोपीने पीडित वृत्तनिवेदिकेला टीव्हीवर पाहिले. त्यानंतर तिला फेसबुकवर शोधले आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. मात्र, पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे लग्न झाले आहे, असे त्याला समजल्यानंतर त्याने तिच्या पतीला देखील अश्लील मेसेज पाठवले. त्यामुळे तिने कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पश्चिम बंगाल येथील कल्याणीमधून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १६ जुलैपर्यंत पोलीस रवानगी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details