महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 18, 2022, 12:54 PM IST

ETV Bharat / state

Nurses Protest : केईएम रुग्णालयात नर्सचे आंदोलन ; डॉक्टर सेवा निवासस्थानात पुनर्वसनाची मागणी

केईएम रुग्णालयात शिकाऊ नर्स राहत असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. ही इमारत खाली करून नर्सचे इतर ठीकाणी पुनर्वसन केले जाणार (Nurses protest at demanding rehabilitation) आहे. याच्या निषेधार्थ सुमारे ३०० नर्सनी केईएम रुग्णालयात आंदोलन केले (Nurses protest at KEM Hospital) आहे.

Nurses protest at KEM Hospital
केईएम रुग्णालयात नर्सचे आंदोलन

मुंबई :केईएम रुग्णालयात काही दिवसापूर्वी शिकाऊ नर्स राहत असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. ही इमारत धोकादायक झाल्याने रिक्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही इमारत खाली करून नर्सचे इतर ठीकाणी पुनर्वसन केले जाणार (Nurses protest at demanding rehabilitation) आहे. याच्या निषेधार्थ सुमारे ३०० नर्सनीकेईएम रुग्णालयात आंदोलन केले (Nurses protest at KEM Hospital) आहे.

इमारत धोकादायक : मुंबई पालिकेचे परेल येथे केईएम रुग्णालय आहे. पालिकेच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात याचा समावेश आहे. रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय तसेच नर्स प्रशिक्षण केंद्रही चालवले जाते. यात शेकडो विद्यार्थीनी नर्सचे शिक्षण घेत आहेत. याच ठिकाणी नर्स सेवा निवासस्थान आहेत. १९२६ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असेल तरी या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ३ नोव्हेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास जेवण बनवण्यासाठी संगीता चव्हाण (वय ४० वर्षे) या आल्या असता सिलिंगचा काही भाग त्यांच्यावर कोसळला. यात चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला आहे. याआधीही फॅनसह स्लॅब कोसळला (Nurses protest at KEM Hospital) होता.


नर्सचे आंदोलन :सदर इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पालिकेने इमारत त्वरित रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. इमारत खाली केल्याने ३०० नर्सची शिवडी टीबी रुग्णालयात असलेल्या कर्मचारी निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली जाणार (Nurses Protest) आहे. मात्र या नर्सना टीबी रुग्णालयात जायचे नाही. केईएम रुग्णालयात डॉक्टर सेवा निवासस्थान आहेत. त्यात त्यांचे पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या मागणीसाठी आणि सेवा निवासस्थान खाली करावे लागत असल्याने ३०० नर्सनी रुग्णालयात आंदोलन केले आहे. याबाबत आता रुग्णालयाच्या डीन आणि नर्स यांच्यात बैठक होत असून मध्यम मार्ग काढला जाणार (protest at KEM Hospital) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details