महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Update Maharashtra : राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली; ५ जणांचा मृत्यू

राज्यात १२ ते १४ एप्रिल, १९ व २० एप्रिलला एक हजारावर रुग्ण आढळून आले होते. आज(शुक्रवारी) त्यात घट होऊन ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. प्राप्त आकडेवारीनुसार ११४७ रुग्ण बरे झाले आहेत. तर केवळ ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६१२९ ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यापैकी ५७ रुग्ण 'आयसीयू'मध्ये दाखल आहेत.

Corona Update Maharashtra
कोरोना

By

Published : Apr 21, 2023, 8:17 PM IST

मुंबई:राज्यात आज ९९३ रुग्णांची नोंद झाली आहे. ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ११४७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ६० हजार ४९९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ६ हजार ३२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४८ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी १८,११८ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४,८७७ चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत, २९४९ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत तर २९२ चाचण्या सेल्फ टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यात XBB 1.16 व्हेरियंटचे ६८१ रुग्ण आढळून आले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


साडे चार महिन्यात ८० मृत्यू:१ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडेचार महिन्यात कोरोनामुळे ८० मृत्यू झाले आहेत. त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७२.५ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ८१ टक्के मृत्यू झाले आहेत. ११ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत.


५७ रुग्ण गंभीर:राज्यात २० एप्रिल रोजी ६१२९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५८३४ म्हणजेच ९५.२ टक्के रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. २९५ टक्के ४.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २३८ म्हणजेच ३.९ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत. ५७ म्हणजेच ०.९ टक्के रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.


मुंबईत २२६ रुग्ण, २ मृत्यू:मुंबईमध्ये आज २२६ रुग्णांची नोंद झाली आहे. २८२ रुग्ण बरे झाले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका ५६ वर्षीय महिलेला कॅन्सर तर दुसऱ्या ४४ वर्षीय महिलेला टीबीचा आजार होता. सध्या कोरोनाचे १४६६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ४२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ६१ हजार ५६९ रुग्णांची, १९ हजार ७५८ मृत्यूंची तर ११ लाख ४० हजार ३४५ बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.


राज्यात 'या' दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद :
१२ एप्रिल ११२५
१३ एप्रिल १०८६
१४ एप्रिल ११५२
१९ एप्रिल ११००
२० एप्रिल १११३

ABOUT THE AUTHOR

...view details