महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : राणीबागेतील वाघ, पेंग्विनचे दर्शन घ्या आता घरात बसून

आज व्याघ्र दिनानिमित्त पर्यटकांना राणी बागेतील शक्ती वाघाची धमाल मस्तीचा आनंद घेतला. आज संध्याकाळपर्यंत ६ हजार लोकांनी सोशल मिडीयावर पसंती दिली असून पर्यटकांसाठी राणी बाग खुली होत नाही, तोपर्यंत रोज सोशल मिडीयावर शक्ति वाघाच्या धमाल मस्तीसह पेंग्विनचेही दर्शन घडवून आणणार असल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

राणी बागेतील वाघ पेंग्विनचे दर्शन
राणी बागेतील वाघ पेंग्विनचे दर्शन

By

Published : Jul 29, 2020, 9:36 PM IST

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेली भायखळा येथील राणीबाग बंद आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने बच्चे कंपनीही घरी बसून कंटाळली आहे. यासाठी आज व्याघ्र दिनाचे औचित्य साधत राणीबागेतील वाघ आणि पेंग्विनचे दर्शन सोशल मीडियावर करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

राणीची बाग म्हटलं की लहानग्यांसाठी मज्जाच असते. या बागेत विविध पशु-पक्षी पाहण्याकरता पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राणी बागेत लोकांची वर्दळ कमी असल्याने येथील ‘शक्ती’ वाघाच्या दिनचर्येचे, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचालींचे आकर्षण ठरणारे आहेत. त्यामुळेच आज व्याघ्र दिनानिमित्त पर्यटकांना शक्ती वाघाची धमाल मस्तीचा आनंद घेता यावा, यासाठी सोशल मिडीयाला थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.

तर, आज व्याघ्र दिनानिमित्त पर्यटकांना राणी बागेतील शक्ती वाघाची धमाल मस्तीचा आनंद घेतला. आज संध्याकाळपर्यंत ६ हजार लोकांनी सोशल मिडीयावर पसंती दिली. त्या पार्श्वभूमीवर, पर्यटकांसाठी राणी बाग खुली होत नाही, तोपर्यंत रोज सोशल मिडीयावर शक्ति वाघाच्या धमाल मस्तीसह पेंग्विनचेही दर्शन घडवून आणणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details